aatmdheydefencefoundation.in

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

“सेवा, संस्कार आणि यशाचा संगम”

आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल, कोकमठाण ही आध्यात्मिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेली महाराष्ट्रातील एक नावाजलेली संस्था आहे. संस्थेच्या माध्यमातून परम पूज्य गुरुमाऊलींच्या कृपाशिर्वादाने व संस्थेचे अध्यक्ष मा. नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांच्या संकल्पनेतून आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

दरवर्षी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी १०वी व १२वी उत्तीर्ण होतात. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न भारतीय संरक्षण दल (आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, आसाम रायफल्स, TA बटालियन), तसेच महाराष्ट्र पोलीस व केंद्रीय सुरक्षा दल (CRPF, ITBP, BSF, CISF, RPF) मध्ये भरती होऊन देशसेवा करण्याचे असते.

या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने हे केंद्र कार्यरत आहे. येथे विद्यार्थ्यांना भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले शारीरिक प्रशिक्षण, लेखी परीक्षा तयारी, वैद्यकीय तपासणी आणि मुलाखत मार्गदर्शन दिले जाते.

संस्थेमध्ये अनुभवी माजी सैनिक प्रशिक्षक, तज्ञ शिक्षकवृंद आणि आत्मामालिक हॉस्पिटलमधील अनुभवी डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना संपूर्ण तयारी करून घेतली जाते. तसेच सर्व प्रकारच्या शासकीय भरती परीक्षांसाठी लेखी व मैदानी सरावाची विशेष सोय उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ३ महिने, ६ महिने किंवा १ वर्ष अशा कालावधीसाठी प्रशिक्षण वर्ग उपलब्ध आहेत.

आमचे ध्येय

युवक-युवतींना शासकीय व निमशासकीय सेवांमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेले दर्जेदार शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक प्रशिक्षण प्रदान करणे.
शिस्त, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून सक्षम, आत्मविश्वासी व कर्तव्यदक्ष उमेदवार घडवणे हे आमचे ध्येय आहे.

आमची दृष्टी

समाजातील प्रत्येक युवकाला योग्य दिशा देऊन त्यांना स्वावलंबी व यशस्वी बनवणे, तसेच देशसेवेसाठी प्रेरित आणि सक्षम नागरिक तयार करणे ही आमची दृष्टी आहे.
ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देत उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळख निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.